Department of Marathi
Department of Marathi
K.M.C. College, Khopoli — HOD: Dr. Bhausaheb M. Nannaware
3
Teaching Staff
About the Department
के.एम.सी.महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर सन १९८३ मध्ये मराठी विभाग सुरू झाला.
४३ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या मराठी विभागात सातत्याने विद्यार्थीकेंद्री असे शैक्षणिक, संशोधनपर, सांस्कृतिक व भाषिक कौशल्य विकासासाठीचे अनेक उपक्रम राबवले जातात.
मराठी विभागाची पायाभरणी साहित्यिक व पत्रकार कै.डॉ.माधव पोतदार यांनी केली. ते विभागाचे पहिले विभाग प्रमुख होते. त्यानंतर डॉ. विनया भंडारी, प्रा.मोहन बल्लाळ यांनी विभागाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.
या मान्यवर प्राध्यापकांच्या योगदानातून विभागाच्या विकासाचा आलेख कायम उंचावर गेला.
विभागातील उपलब्ध शिक्षणक्रम
विभागात प्रथम व द्वितीय वर्ष कला, वाणिज्य, शास्त्र व संगणक वर्गासाठी मराठी भाषा आणि साहित्याच्या विविध अभ्यासपत्रिका शिकविल्या जातात.
तृतीय वर्ष बी.ए. (मराठी - मेजर) पदवीसाठी सहा अभ्यासपत्रिका आहेत.
२०२४-२५ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अन्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही मराठी व मराठीशी संबंधित अन्य कौशल्ये अभ्यासण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.
माध्यमातील करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना मिळाव्यात या उद्देशाने विभागाने ‘वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन प्रमाणपत्र शिक्षणक्रम’ सुरु केला आहे.
मराठी विभागाने सुरुवातीपासूनच भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी असलेला संबंध जोडून दाखविण्यावर भर दिला आहे.
अभ्यासक्रम, संशोधन व पूरक उपक्रमाद्वारे भाषा आणि साहित्य अभ्यासाच्या नव्या परंपरा निर्माण केल्या आहेत.
तसेच NEP २०२० नुसार व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करून पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर कौशल्याधारित अभ्यासक्रमावर भर दिला आहे.
विभागाच्या यशाचा चढता आलेख
पदवी व पदव्युत्तर स्तरावर उपप्राचार्य डॉ.नितीन आरेकर, सोनाली गरुडे, मेघा ठाकरे, प्रा.लीना दळवी, प्राचार्य मिलिंद विद्वांस, स्मिता कालेकर, ओंकार खंडागळे अशा अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर मराठी विषयात सुवर्णपदकासह विद्यापीठ गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवला.
पदवीनंतर भागाचे अनेक विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षक, वकील, पत्रकार तसेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
वक्तृत्व, निबंधलेखन, काव्यवाचन, वादविवाद, पुस्तक परीक्षण अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या गुण कौशल्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न आहे.
वाचन संस्कृती जपण्यासाठी विभागाचे अनेक उपक्रम सुरु आहेत.
विभागाचे बहुविध उपक्रम
- वाचन प्रेरणा दिन
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
- मराठी भाषा गौरव दिन
- लेखक आपल्या भेटीला
- गाजलेल्या उत्तम पुस्तकांवरील चर्चा व परीक्षण लेखन
- मैत्री - नव्या पुस्तकांशी
- वक्तृत्व व लेखन कार्यशाळा
- माझे वाचन ...माझे लेखन
- शोध लिहित्या हातांचा
- अशी बोलते माझी कविता (कवी संमेलन)
- भाषा, साहित्य व पत्रकारितेतील संधी - संवादसत्र
- भाषा आणि साहित्याशी संबंधित व्याख्याने
- चर्चासत्र
- परिसंवाद
- काव्यवाचन
- वक्तृत्व
- निबंध लेखन
- कथाकथन
- हस्ताक्षर स्पर्धा
या उपक्रमांतून उत्तम वक्ते व लेखक घडवण्यासाठी मदत होते आहे.
मान्यवरांचा विद्यार्थ्यांशी संवाद
- संवाद लेखकाशी
- स्पर्धा परीक्षेची तयारी कशी कराल
- मराठी भाषा विनिमय आणि व्यवहार
- वाचाल तर समृद्ध व्हाल
- आजचे शिक्षण : वास्तव व अपेक्षा
- माझा साहित्यलेखन प्रवास
- लेखनकला : कौशल्य व संधी
ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळशेकर, प्रा.एल.बी. पाटील, लेखिका उज्वला दिघे, लेखक व समीक्षक डॉ.नीतिन आरेकर, संपादक डॉ.शैलेश त्रिभुवन, कवी विनायक पवार, डॉ.भटू वाघ, गझलकार ऐ.के.शेख, अर्थतज्ज्ञ डॉ.सत्यनारायण कोठे, निरूपणकार श्रीराम पुरोहित, ग्रंथपाल नारायण बारसे, पत्रकार व लेखक वैभव चाळके, कवयित्री ज्योत्स्ना राजपूत, साहित्यिक डॉ.सुभाष कटकदौंड या मान्यवर साहित्यिक व अभ्यासकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना भाषा आणि साहित्याचे संस्कार दिले आहेत.
विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित होतानाच व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी मराठी विभाग सतत प्रयत्नशील असतो.
काळाबरोबर आलेले नवे भाषा तंत्र, संगणकावरील मराठी, माध्यमांसाठी विविध कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये यावीत या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरू असतात.